भोई समाजाचे कुलदैवत
बिजासनी देवी
बिजासनी देवी दोन ठिकाणी वसलेली आहे.पहिली बडी बिजासनी देवी ही महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेवरील बिजासनी घाटात वसलेली आहे.दुसरी मुख्य बिजासनी देवी ही दुर्बड्या या गावी वसलेली आहे.हे गाव शिरपुर शहरापासुन ३७ किमी.अंतरावर आहे.एकविरा देवी
एकविरा देवी ही धुळे शहरात पांझरा नदीच्याकाठावर वसलेली आहे.देवीचे भव्य दिव्य मंदिर आपणास पहावयास मिळते.आशापुरी देवी
आशापुरी देवी ही पाटण या गावी वसलेली आहे.पाटण हे गाव ता.शिदंखेडा पासुन २.५ किमी अंतरावर आहे.रेणुका देवी
रेणुका देवी चांदवड गावी चांदवड नाशिक महामार्ग,चांदवड घाट या ठिकाणी वसलेली आहे.तुळजा भवानी
महाराष्ट्राची कुलदैवत म्हणुन प्रसिद्ध असलेली तुळजा भवानी देवी तुळजापूर शहरात वसलेली आहे.चौधराई माता
चौधराई माता ही पैठण शहरात वसलेली आहे.जि.औरंगाबाद.नगाई माता
नगाई माता ही पिळोदा गावात तापी नदीच्या पाञात एका छोट्या मंदिरात वसलेली आहे.शिरपुर शहरापासुन ३० किमी.अंतरावर आहे.ईच्छा देवी
ईच्छा देवी जळगाव शहरापासुन २६ किमी.अंतरावर,मेहरून या गावी वसलेली आहे.कुळसाई माता
कुळसाई माता ही पिळोदा गावात तापी नदीच्या पाञात एका छोट्या मंदिरात वसलेली आहे.शिरपुर शहरापासुन ३० किमी.अंतरावर आहे.चामुंडा माता
चामुंडा माता देवी गुजरात राज्यातील थंड हवेचे ठिकाण,समुद्र सपाटी पासून 800 मिटर उंचीवर पावागडावर वसलेली आहे.चावंडाई माता
चावंडाई माता धरणगाव शहरा पासुन 16 किमी अंतरावर असलेले बाबुळगावी य़ेथे एका छोट्या मंदिरात वसलेली आहे.मनुदेवी येवला
चोपड़ा महामार्गावर आढगाव-कासार खेड़ा पासून ९ किमी अंतरावर सातपुडाच्या डोंगरात तापी नदीच्या काठी वसलेली आहे.सती देवी
सती देवी ता.शिदंखेडा पासुन 45 किमी अंतरावर बोरीस गावी भव्य दिव्य मंदिर वसलेली आहे.कालंका माता
कालंका माता मंदिर पैठण शहराजवळ वसलेले आहे.