BhoiVarVadhu

नियम आणि अटी :-
* वर-वधु नाव नोंदणी हि मोफत आहे. वर-वधु आपली नाव नोंदणी हि ऑनलाईन www.bhoivarvadhu.com या संकेतसथळावर जाऊन किंवा ऑफलाईन फॉर्म भरून करू शकतात.

* मोफत नाव नोंदणी साठी आपला अचूक मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे.

* मोफत नाव नोंदणी साठी www.bhoivarvadhu.com या संकेतस्थळाच्या मुख्य पेजवर जाऊन [ मोफत नोंदणी / Free Registration] या बटन वर क्लिक करा ,त्यानंतर एक फॉर्म दिसेल,फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती अचूकपणे भरा,माहिती भरून झाल्यानंतर [ Submit ] या बटन वर क्लिक करा. तुमचा फॉर्म जमा झाल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक व पासवर्ड मिळेल.

* नाव नौंदणीसाठी वधुचे वय १८ वर्ष पुर्ण असणे आणि वराचे वय २१ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.

* १८ वर्षाखालील वधु आणि २१ वर्षाखालील वर नाव नौंदणीस पात्र नाहीत.

* मोफत नाव नोंदणी केल्यानंतर सभासदाला मिळालेला नोंदणी क्रमांक व पासवर्ड हा कायमस्वरूपी लक्ष्यात असू देणे.या नोंदणी क्रमांकाच्या व पासवर्डच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या आवडत्या स्थळाची संपूर्ण माहिती मिळवू शकतात.

* वर-वधूला आवडलेल्या स्थळांची संपूर्ण माहिती हवी असल्यास वार्षिक फी रु.३९९/-भरावी लागेल.

* वार्षिक फी भरल्यानंतर आपण प्रत्येक महिन्याला ३० आवडत्या स्थळांची संपूर्ण माहिती बघू शकतात,असे एका वर्षाला ३६० स्थळांची संपूर्ण माहिती आपण बघू शकतात.

* एकदा भरलेली फी हि कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

* सभासद फी रु. ३९९/- हि तुम्ही ऑनलाईन किंवा बँक अकाउंट मधून ट्रान्सफर किंवा बाय हॅन्ड करू शकतात.

* नोंदणी करतांना सभासदाने आपली संपूर्ण माहिती हि सत्य असल्याची खात्री करून घेणे. खोट्या स्वरूपाची माहिती आढळल्यास त्यास सभासद हा स्वतः संपूर्णरित्या जबाबदार असेल, www.bhoivarvadhu.com किंवा कंपनी कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.

* आपल्या आवडत्या स्थळांच्या माहितीतील सत्यता तपासणीची संपूर्ण जबाबदारी हि वर-वधु पालकांची आहे. त्यास www.bhoivarvadhu.com किवा कंपनी कुठल्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

* सभासदांनी आपली संपूर्ण माहिती सत्य स्वरूपात देणे, माहिती खोटी आढळल्यास सभासद हा त्यास संपूर्ण जबाबदार असेल व त्या सभासदाची नोंदणी हि रद्द करण्यात येईल.

* आम्ही आपणांस वर-वधु स्थळांची माहिती पुरवतो, हि माहिती आपल्याला सभासदांनी भरलेल्या फॉर्ममधूनच मिळालेली असते. वर-वधूंची माहिती सत्य आहे कि नाही हे तपासुन पाहण्याची संपुर्ण जबाबदारी पालकांची आहे, त्यास www.bhoivarvadhu.com किवा कंपनी कुठल्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

* आम्ही आपणांस फक्त वर- वधु स्थळांविषयी माहिती पुरवतो त्यात लग्न जमेलच याची खात्री देऊ शकत नाही.

* स्थळ पसंत झाल्यास पुढील कार्यक्रम जसे मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम,बोलणी,साखरपुडा,लग्न तारीख हे सर्व करण्याची जबाबदारी हि वर-वधु पालकांची असेल,त्यात www.bhoivarvadhu.com किंवा कंपनीचा कुठलाही सहभाग असणार नाही.

* कुठल्याही कारणास्तव साखरपुडा किंवा लग्न मोडल्यास www.bhoivarvadhu.com किंवा कंपनी कुठल्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

* लग्न जोडतांना वर-वधुच्या पालकांनी जिकाही बोलणी किंवा पैश्यांचा व्यवहार किंवा इतर काही अटी ठरवल्या असतील त्याच्याशी www.bhoivarvadhu.com किंवा कंपनीचा कुठलाही संबंध किंवा जबाबदारी नाही.

* लग्न जमल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारची फी आकारात नाही.

* संपूर्ण नियमावलीत किंवा संकेतस्थळावरील कुठलाही बदल करण्याचा अधिकार फक्त कंपनीचाच आहे.

* नोंदणी हि संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यांसाठी (फक्त भोईसमाजाकरिता) खुली आहे.

* ई-मेलद्वारे: ऑफलाईन फॉर्म भरून स्थळांची संपूर्ण महिती व फोटो bhoivarvadhu@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा ७०४००१०६९३ या Whatsapp नंबर वर पाठवावी.

                                                                                          ऑफिस पत्ता :-
                                                                                                  WAB IT SOFTWARE PVT. LTD.
                                                                                                  ४0१,चौथा मजला,निर्माण संकुल ,
                                                                                                  आयसीआयसीआय एटीएम च्या वरती ,
                                                                                                  सिद्धार्थ नगर,औंधगांव पुणे -४११00७.
संपर्क:-
श्री. सचिन वाडिले (भोई) [७०४००१०६९३]
सौ. प्रियंका वाडिले (भोई)[७०४००१०६९३]