भोई समाजाविषयी माहिती


भोई समाज

आपला भोई समाज हा भारताचा प्राचीन वंश आहे.ज्याचा उल्लेख महाभारत व रामायण सारख्या प्राचीन महाकाव्यात मिळतो भोई समाज हा शैव धर्माचा वंशज मानला जातो.(शैव धर्म:-भगवान शंकराला व त्यांचे अनेक रुपाला मानणारे व पूजा करणारा धर्म) आपण मुळात आदिवासी व भटकंती करणारी जमात आहोत.ओरिसातील भोई वंशांचा उल्लेख इतिहासात केला आहे जंगल आणि जमिनीवर अवलंबून असलेले पाणी,ते नैसर्गिक संसा धनांच्या मदतीने जीवन जगत आलो आहोत.




रहिवासी

आपला भोई समाज हा १८०० शतकांपासून उड़ीसा राज्यातील मूळ रहिवासी आहे परंतु अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठी आपले वंशज इतर राज्यात ही भटकंती करू लागलेत जसे की महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, जम्मू कश्मीर, राजस्थान, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश इत्यादि महाराष्ट्र राज्यात भोई समाज प्रामुख्याने मुंबई, नासिक, धुळे, जळगाव, पुणे, नगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, ठाणे, कल्याण इत्यादी जिल्ह्यात वास्तवास आहे.






1.राजांची पालखी उचलणे-

छत्रपती शिवाजी राजे, संभाजी राजे, माता जिजाऊ यांची पालखी उचलून त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाहणी पोहोचवण्याचे काम आपले वंशज करत असत यावरून त्यांना राजभोई असे संभोधले गेले. अजून सुद्धा आपल्या काही पणजोबा किंवा आजोबा कडे राजा महाराजां कडून मिळालेली ताम्रपात्र उपलब्ध आहेत.




2. मासेमारी -

राजांचा काळ संपल्यानंतर पालखी उचलण्याचे कामही संपुष्टात आल्याने आपले वंशज हे मासेमारी व्यवसायाकडे वळले ते समुद्रात, खाडीत, नदीत, खोऱ्यात, तलाव, नाले इत्यादी ठिकाणी मासेमारी करू लागलेत. मासे पकडून त्यांना बाजारात विकून आपली उपजीविका भागवू लागलेत. मासेमारी करत म्हणून त्यांना झिंगाभोई म्हणून ओळखले जाऊ लागले.




3. गाढवांच्या साहाय्याने दळणवळण करणे -

आपले बरेचसे वंशज हे गाढव पाळत आणि गाढवांच्या साहाय्याने ते जड माल वाहून ने-आन करत जसे माती, वाळू, दगड, विटा, डांगर, टरबूज इत्यादी. गाढवांचा वापर केल्या मुळे त्यांना गाढव भोई म्हणून ओळखले जाते.




4. भेळभत्ता, बेदाणे, फुटाणे विक्री –

आजही आपले बरेचसे लोक हे भेळभत्ता, बेदाणे, फुटाणे विक्री करून आपली उपजीविका भागवत आहेत.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील मोठ्या मोठ्या शहरांत जाऊन आपले बरेचसे लोक चणे, फुटाणे विकणे, भाजीपाला विकणे इत्यादी व्यवसाय करू लागलेत.




5. सध्याचा व्यवसाय –

आपले बरेचसे पारंपरिक व्यवसाय आता लुप्त झाले असून भोई समाज आता बराच प्रगतिशील झाला आहे,
दिवसेंदिवस आपला समाज प्रगती करू लागलाय. महाराष्ट्रात पुणे, मुंबई किंवा इतर राज्यांत,
इतर देशांत सुद्धा एक चांगला नोकरदार वर्ग कार्यरत आहे [इंजिनिर्स, डॉक्टर्स, वकील, सरकारी अधिकारी, शिक्षक, राजकारणी इत्यादी.] आपला विकास करू लागला आहे.